रत्नागिरी : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात जन जीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. अनेक गावांमधील वीजपुरवठा मंगळवार रात्रीपासूनच खंडित झाला आहे.
काही गावांमध्ये विजेचा पुरवठा कार्यान्वित असला तरी तो सातत्याने खंडित होत होता. मान्सूनपूर्व पावसामध्ये अशी स्थिती असेल तर प्रत्यक्ष पावसाळ्यात काय स्थिती असेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत आहे. अशातच काल ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करीत जोरदार पाऊस पडला. पावसाने झोडपून काढले होते. पावसाळ्याच्या अनुषंगाने गटारांची साफसफाई केल्यानंतरही शहरातील अनेक भागामध्ये गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र होते. शहरामध्ये कुठेही फारसा चिखलाचे साम्राज्य झाल्याचे चित्र दिसत नव्हते. या पावसामध्ये कुठेही फारसे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही. मात्र काही गावांमध्ये विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित झालेला वीजपुरवठा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न महावितरण विभागाकडून सुरू असले, तरी सायंकाळी उशिरापर्यंत अनेक गावांमधील वीजपुरवठा कार्यान्वित झालेला नव्हता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 22-05-2025













