रत्नागिरी : जांभळं काढताना झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १९) घडली. दीपक विलास पवार (वय २७, रा. कोळंबे मधला वठार, रत्नागिरी) असे त्या तरुणाचे नाव आहे. दीपक हा कोळंबे येथील प्रवीण दामले यांच्याकडे मजुरीचे काम करत होता.
१५ मे रोजीही तो कोळंबे, खांबाचा मळा येथील जांभळं खाण्यासाठी झाडावर चढला होता. पाय अचानक घसरून तो खाली पडला. त्यात त्याच्या पोटाला, डाव्या हाताला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांनी त्याला तातडीने प्रथम खासगी रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 22/May/2025













