रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षक विभाग आणि शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांविषयीची दोनदिवसीय विभागस्तरीय कार्यशाळा आजपासून (ता.२२) शासकीय विभागीय ग्रंथालयात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.
लोकमान्य टिळक ग्रंथालयात होणाऱ्या या कार्यशाळेला संचालक अशोक गाडेकर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशीच्या सत्रात पश्चिम सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी शौविक बिस्वास हे ”राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजना” या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात ”सोशल मीडिया आणि ग्रंथालयाचे बदलते स्वरूप” या विषयावर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल, किरण धांडोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे हे ”ग्रंथालय संचालनालयाच्या विविध योजना” या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी २३ रोजी पहिल्या सत्रात सहाय्यक धर्मादाय आयुक्त एन. एस. सय्यद शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय वार्षिक अहवाल, अंकेक्षण अहवाल, कार्यकारणी बदल अहवालबाबत मार्गदर्शन, शंका निरसन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कोकण विभागील सर्व शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 22-05-2025













