खेड : महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात कोसळून अपघातग्रस्त झालेली मोटार काल हर्षद माधव धिवार (४६, रा. कांदिवली मुंबई) यांच्या ताब्यात देण्यात आली. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर ही गाडी मालकाकडे सुपूर्द करण्यात आली.
हर्षद धीवार यांच्या मालकीची मोटार परमेश पराडकर हे घेऊन मोरे व पराडकर कुटुंबीयांसह मुंबईतील मिरारोड येथून देवरूखला येत होते. भरणे येथे जगबुडी नदीत मोटार कार कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील मोटारीचे पूर्ण नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर येथील पोलिसांनी मोटारमालक धिवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार ते तातडीने येथील पोलिस ठाण्यात हजर झाले. आवश्यक कागदपत्रे तपासल्यानंतर मोटार त्यांच्या ताब्यात देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 22/May/2025













