संगमेश्वर : पारेख पेट्रोल पंपाजवळ वडाचे झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित

संगमेश्वर : संगमेश्वर येथील पारेख पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामात माती उकरल्याने वडाचे झाड कोसळून कसबा उच्चदाब वाहिनीचे सहा खांब वाकले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

बुधवारी संध्याकाळी सहाच्या दरम्यान कसबा गावातील वीजपुरवठा इतर ठिकाणाहून वीज घेऊन सुरू करण्यात आला. मात्र इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने पारेख पेट्रोल पंपाजवळील भाग, मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे या ठिकाणचा वीजपुरवठा बंद राहिला आहे. हे काम गुरुवारी सकाळी सुरू होऊन दुपारीपर्यंत संपण्याची अपेक्षा आहे. तसेच संगमेश्वर आयटीआयजवळील खांब माती वाहून गेल्याने पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे आयटीआय परिसरातील विद्युत पुरवठा बंद आहे.

ही सर्व कामे आज तातडीने पूर्ण करून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. खंडित वीजपुरवठ्याबाबत खेद आहे, असे महावितरण कंपनीने पत्रकाद्वारे कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 22-05-2025