खेड : लाकडी दांडका डोक्यात मारून गंभीर दुखापत; एकावर गुन्हा दाखल

खेड : शहरातील तीनबत्ती नाका जवळील मुकादम लॅन्डमार्क या इमारतीमधील कॉटनर्किंग शोरुमजवळ एका इसमाने व्यवसायाने ड्रायव्हर असणाऱ्या इसमास लाकडी दांडका डोक्यात मारून गंभीर दुखापत आणि शिवीगाळी करून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:४५ वाजता घडली.

या मारहाणीत जखमी असलेले फिर्यादी खलफान यासीर मणियार (वय-३०, ड्रायव्हर, रा. खेड पोत्रिक मोहल्ला, सफा मस्जिद चौक, खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्या नुसार संशयित मनजूर दाभोळकर (रा. सुकदर, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड शहरातील तीनबत्ती नाका जवळील मुकादम लॅन्डमार्क या इमारतीमधील कौटनकिंग शोरूमजवळ संशयित मनजूर दाभोळकर हा फिर्यादी खलफान मणियार यांची आई जैतूस मणियार व भाऊ कैफ मणियार यांना शिवीगाळ करून हाताच्या थापटाने मारहाण करीत होता, म्हणून कैफ मणियार याने फिर्यादी खलफान मणियार याला फोन करून सांगितल्याने खलफान मणियार याठिकाणी आले असता खलफान मणियार हे भाऊ व आई यांना बाजूला करीत असताना संशयित मनजूर दाभोळकर याने तेथे असलेला लाकडी दांडका फिर्यादी खलफान मणियार यांच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत करून शिवीगाळी करून ठार मारण्याची धमकी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 22/May/2025