रत्नागिरी, २२ मे २०२५: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील चित्रकला आणि क्राफ्टप्रेमींसाठी एक खास भेट म्हणजे “कलादालन” या वैविध्यपूर्ण कला दुकानाचे उद्घाटन. बुधवार, २१ मे २०२५ रोजी शुभ मुहूर्तावर रत्नागिरीतील अरिहंत प्लॅटीनो बिल्डिंग, शॉप क्रमांक ११, एस.व्ही. रोड येथे हा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. रत्नागिरीतील पहिले स्वतंत्र असे हे कला दुकान चित्रकला, रेजिन आर्ट, क्राफ्ट, लिपन आर्ट, मंडला आणि फाइन आर्ट मटेरियलच्या विस्तृत कक्षेसह ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे.
उद्घाटन सोहळा
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मरीन एक्सपोर्टचे संचालक दीपक गद्रे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रकार विष्णू परीट यांच्यासह पत्रकार पराडकर, टिकेकर (जी.जी.पी.एस. हायस्कूल), पावसकर (फाटक हायस्कूल), संगीत क्षेत्रातील विलास हर्षे, हेरंब जोगळेकर, गायिका श्वेता जोगळेकर, आर्किटेक्ट मनोज जोशी, कॅमल कंपनीचे रिजनल प्रमोशनल मॅनेजर नंदकुमार गायकवाड, क्राफ्ट आर्टिस्ट घाणेकर, चित्रकार निलेश शिळकर, अभय सावंत आणि ज्येष्ठ व्यावसायिक आनंद जोशी यांची उपस्थिती लाभली. सोळा वर्षीय स्केच आर्टिस्ट मानव इप्ते याने धनंजय कुलकर्णी आणि दीपक गद्रे यांचे स्केच रेखाटले, तर राहुल कळंबटे यांनी रांगोळी साकारली.
कलादालनची वैशिष्ट्ये
रत्नागिरीतील कलाकारांना लागणाऱ्या साहित्याची कमतरता दूर करण्यासाठी “कलादालन”ने खास उपक्रम हाती घेतला आहे. येथे चित्रकलेचे सर्व प्रकारचे कलर्स, ब्रशेस, स्केचिंग, वॉटर कलर, ऑइल कलर, स्किन टोन, ग्रे टोन, नॉर्वे पेपर्स, स्ट्रेच्ड कॅनव्हास, स्केचिंग आणि आर्ट टूल्स उपलब्ध आहेत. क्राफ्ट सेक्शनमध्ये हँडमेड पेपर्स, डिझाइन पेपर्स, टिंटेड पेपर्स, रेजिन आर्ट मटेरियल, लिपन आर्ट मटेरियल, एमडीएफ बोर्ड्स, ड्रॉइंग टूल्स, वूड बर्निंग टूल्स, पेंटिंग पेबल्स, ग्लास बिड्स, स्टोन्स, एम्ब्रॉयडरी मटेरियल आणि विविध क्राफ्टिंग टूल्स उपलब्ध आहेत.
कलाकारांसाठी आवाहन
“कलादालन”चा मुख्य उद्देश स्थानिक कलाकारांना नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे हा आहे. येथे सर्व प्रकारच्या कला आणि क्राफ्ट साहित्याची विस्तृत श्रेणी उपलब्ध असून, कलाकारांना लवकरात लवकर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “कलादालन”च्या माध्यमातून रत्नागिरीतील कलाकारांना आपली कला अधिक समृद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
“कलादालन”च्या उद्घाटनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कलाकारांना एक नवे व्यासपीठ मिळाले आहे. या दालनामुळे स्थानिक कलाकारांना आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होईल आणि कला क्षेत्राला नवे बळ मिळेल. कलाप्रेमींनी या दालनाला भेट देऊन येथील वैविध्यपूर्ण साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 22-05-2025













