राजापुरात ‘कामगार कल्याण’ योजनेसाठी नवीन नोंदणी

राजापूर : कामगार कल्याण विभागाकडील योजनेसाठी नवीन अर्ज नोंदणी आणि केवायसी तपासणीसाठी आमदार किरण सामंत यांनी राबविलेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये १५८ केवायसी नोंदणी, २५ नवीन अर्ज नोंदणी झाली आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुकाप्रमुख दीपक नागले, महिला शहरप्रमुख हर्षदा खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख सौरभखडपे, महिला उपशहरप्रमुख भाग्यश्री चव्हाण उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 22/May/2025