देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी ते शास्त्री पुलादरम्यान गॅस पाइपलाइनचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केल्याने वाहनचालकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. शास्त्री पुलापासून फुणगुसमार्गे गणपतीपुळे जाता येत असल्याने या मार्गावर आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यात संगमेश्वर येथे सतत वाहतूककोंडी होत असल्याने अनेक जण कोंड असुर्डेमार्गे संगमेश्वर बाजारपेठ असे जातात.
गणपतीपुळे येथे जाणारे पर्यटकही याच मार्गाचा वापर करतात. त्यातच या रस्त्यावर पाइपलाइनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यावर आता पाऊस पडल्याने चिखलाचे साम्राज्य झाले आहे. हा मार्ग आधीच पुरेसा रुंद नाही. त्यात खोदकाम आणि त्याचा चिखल यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांची कसरत होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 22/May/2025













