खेड येथील डेंटल कॉलेजच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

खेड, २२ मे २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मधुसिद्धी हॉस्पिटलमध्ये २१ मे २०२५ रोजी पहाटे २:२० वाजण्याच्या सुमारास २२ वर्षीय डेंटल कॉलेजचा विद्यार्थी सूरज प्रभु आंधळे याचा श्वसनाच्या तीव्र समस्येमुळे मृत्यू झाला. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ५५/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये २१ मे रोजी सकाळी ८:४५ वाजता करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज आंधळे (वय २२) हा मूळचा पुण्यातील मांजरी येथील रहिवासी असून, खेड येथील डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी मित्रांसोबत झमझम अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होता. २१ मे रोजी रात्री सूरजने मित्रांसोबत जेवण करून झोपायला गेला. पहाटे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो मोठ्याने श्वास घेऊ लागला. त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला खेड येथील मधुसिद्धी हॉस्पिटलमध्ये डॉ. उपेंद्र तलाठी यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:16 22-05-2025