जेजुरी : जेजुरी पंचक्रोशी मध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग नागरिकांनी अनुभवली. ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झालेला पाऊस क्रित्येक वर्षांनी नागरिकांनी अनुभवला.
जेजुरी परिसरात सुमारे २१७मिलिमीटर पावसाची नोंद रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत झाली होती.
सोमवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पावसाने उसंत घेतली होती सूर्यदर्शन झाले होते. मात्र हे वातावरण काही काळ टिकले, त्यानंतर दुपारी १ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे भरले आहेत. जेजुरी गडाच्या पायरीमार्गावरून धो धो पाणी वाहत असल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती. तर अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरातून पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 26-05-2025














