टेंभ्ये : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे मे महिन्यातच पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
या बदलत्या वातावरणामुळे आंबा घाटामध्ये दाट धुके पसरलेले पाहायला मिळत आहे. घाटातील या दाट धुक्याचे पर्यटकांना आकर्षण असून, त्याचा आनंद लुटताना काही जण घेताना दिसतात.
रत्नागिरी-कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबा घाट हा प्रमुख घाट आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आंबा घाट नेहमीच पर्यटकांना भुरळ पाडत असतो. यावर्षीच्या मान्सूनपूर्व पावसामुळे ऐन मे महिन्यात पर्यटकांना घाटातील दाट धुक्याचा अनुभव घ्यायला मिळत आहे. यामुळे आंबा गाव आणि घाट परिसर पर्यटकांनी गजबजले आहे.
महामार्गाचे काम संथ
सध्या मिऱ्या (रत्नागिरी)-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. घाटातील जवळपास निम्म्यापेक्षा अधिक अंतराचे रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. आंबा घाटापासून कोल्हापूरपर्यंतचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:42 26-05-2025














