रत्नागिरी : प्रशिक्षणार्थी ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची मत्स्य विभागाला भेट

रत्नागिरी : भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) आठ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध योजना आणि कार्यपद्धतीची माहिती दिली. पेठकिल्ल्यातील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

प्रशिक्षणार्थी आठ आयएएस अधिकारी आकाश वर्मा, कुश मोटवानी, नंदलाल साईकिरण, पी. के. सिद्धार्थ रामकुमार, शिवांश सिंग, योगेश मीना, कौसल्या एम., डोनुरु रेड्डी यांनी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयाला भेट दिली.

यावेळी प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत, सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकारी भक्ती पेजे, उत्कर्षा कीर यांनी या आठ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मत्स्य व्यवसाय खात्यासंदर्भातील विविध शासकीय योजना व विभागाच्या कार्यपद्धतीसंदर्भात माहिती दिली. या उपक्रमाला प्रशिक्षण केंद्राचे यांत्रिकी प्रशिक्षण सुजीत हट्टरगे, अनिकेत बोंढाळे, सहकारी कर्मचारी शंकर चव्हाण, रंजन मयेकर यांचेही सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 27/May/2025

Tata safari