खंडाळा बाजारपेठेत साचले पाणी

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा परिसरात सध्या पावसाचा जोर वाढला असून, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र आहे. यात मुसळधार पावसामुळे शनिवारी (ता. २४) खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांच्या हे लक्षात येताच स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टर आणून बाजारपेठेत साफसफाई केली. संपूर्ण खंडाळा बाजारपेठ जलमय झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 27-05-2025

Tata aeris