Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’चे 7500 आणि 3000 आले की नाही? सोप्या स्टेप्सने लगेच करा चेक

मुंबई : Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतर झाला आहे. यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात 3000 आणि 7500 जमा झाले आहेत.

अशाप्रकारे तब्बल 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. या दरम्यान अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. पण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही आहे. त्यामुळे या महिलांचे नेमके पैसे गेले कुठे? हे जाणून घेऊयात.

खरं तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे. त्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत इतकं मात्र नक्की. काही महिलांच्या बाबतीत असे देखील झाले आहे की, त्यांनी अर्जात भरलं वेगळं बँक खातं आणि त्यांच्या वेगळ्या आणि जून्या बँकेत पैसे आले आहेत. तरी काही महिलांचा अर्ज मंजूर होऊन देखील पैसे आले नाही आहे? असं नेमकं काय होतं आहे. हे जाणून घेऊयात. आणि तुमचे नेमके पैसे कुठे गेले आहेत? हे देखील तपासूया.

पैसे बँकेत जमा झाले की नाही असं करा चेक

गुगलवर जाऊन तुम्ही MyAadhar टाईप करा. त्यानंतर आधारची साईट ओपन होईल.

नवीन पेज उघडल्यावर सर्वांत खाली Bank Seeding Status पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधारकार्ड आणि कॅप्चा भरण्याचा पर्याय येईल.

हा कॅप्चा भरल्यावर तुम्हाला Otp येईल. हा ओटीपी भरायचा आहे.

त्यानंतर नवीन पेज ओपन होईल आणि तुमचं आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे. याची माहिती देण्यात येईल.

जर बँकेची नावाचा रकाना रिकामी असेल तर कोणतंच बँक खातं लिंक नाही. त्यामुळे तुम्हाला ते लिंक करून घ्यावं लागेल.

आधारशी बँक लिंक असेल तरच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे.

अशाप्रकारे तुमच्या कोणत्या बँकेत पैसे जमा झाले आहेत. हे तपासता येणार आहे. तसेच ज्या महिलांनी अर्जात वेगळं बँक खातं दिलं आहे आणि दुसऱ्याच बँक खात्यात पैसे आले आहेत. याचा अर्थ त्या महिलांचं जूने बँक खातं आधारशी लिंक होतं. त्यामुळे त्या बँक खात्यात पैसे आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कोणत्या खात्यात जमा झाले आहेत. याची माहिती मिळणार आहे.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.


Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कुठे भरायचा?

नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागले. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणि आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा.


लाडकी बहिण योजना अर्ज कुठे करायचा?

नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागले. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणि आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा.

ladki Bahin Yojana Free Mobile Update : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसे लवकरच जमा केले जातील, असं आश्वासनही राज्य सरकारकडून दिलं जात आहे.अशातच आता लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार आहे, असे मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट (ladki Bahin Yojana Mobile Gift) अशा आशयाचे पोस्ट इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण या व्हायरल पोस्टमागे नेमकं काय सत्य आहे? याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. (A big update has come out regarding Ladki Bahin Yojana. The message that women will get free mobile phones through this scheme has gone viral on social media)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, आता महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोबाईल फोन मोफत देणार असल्याची चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोबाईल फोने गिफ्ट देणार असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ; ‘ही’ अट असणार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 12-10-2024