लांजा : लांजा येथील कीर्तिमहल हॉटेलसमोर चक्कर येऊन पडलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ६ जून २०२५ रोजी दुपारी ३.१५ वाजता हा प्रकार घडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गोठस येथील रहिवासी मिलिंद पांडुरंग दळवी (वय ४५) हे लांजा येथील कीर्तिमहल हॉटेलसमोर अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना तात्काळ हॉटेलमधील लोकांनी डॉ. खानविलकर यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता त्यांना लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, मिलिंद दळवी यांना अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.२३ वाजता ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३३/२०२५, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. लांजा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 12-06-2025














