दापोली : तालुक्यातील टेटवली मोहल्ला मुख्य रस्त्याच्या पुलाखाली आलेली मगर वनविभागाचे रेस्क्यू पथकाने सुरक्षित ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.
दापोली तालुक्यातील टेटवली येथील मोहल्ला लोकवस्तीनजीक ब्रिजखाली पाण्याच्या डोहाजवळील मगर येऊन बसल्याची माहिती सरपंच मोबील टेटवलकर यांनी वनविभागाला दिली. या ठिकाणी लहान शाळकरी मुलांचा व नागरिकांचा वावर असल्याने तिला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आवश्यक होते. कामगिरी वनपाल दापोली रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव, सुरज जगताप, प्रभू साबणे तसेच वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर पथकाचे तुषार महाडिक, मिलिंद गोरिवले आणि त्यांचे पथक उपस्थित होते. दापोली तालुक्यात वन्यजीव लोकवस्तीत आल्यास, जखमी अवस्थेत निदर्शनास आल्यास तत्काळ दापोली वनविभागाशी हॅलो फॉरेस्ट १९२६, वनक्षेत्रपाल दापोली पी. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 12/Jun/2025














