वरिष्ठ व निवडश्रेणीतील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तालुकास्तरावर केंद्र द्यावीत : नीलेश कुंभार

संगमेश्वर : सध्या माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांसाठी रत्नागिरीत एकाच ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रचंड कुचंबणा होत आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण केंद्र देऊन शिक्षकांना सोयीनुसार चांगले प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे करण्यात आल्याचे जिल्हा कार्यवाह नीलेश कुंभार यांनी सांगितले.

प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी विविध प्रशिक्षणासाठी शिक्षक तालुकावार किंवा दोन-तीन तालुक्यासाठी एक अशा प्रकारची शिक्षक प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात येत होती. त्यानुसार शिक्षकांना अत्यंत चांगल्या पद्धतीन व सोयीच्या ठिकाणी प्रशिक्षणाला जावे लागत होते.

त्यामुळे शिक्षकही अतिशय उत्साहीपणाने सर्व ठिकाणी वेळेत हजर राहन प्रशिक्षणाचा लाभ घेत होते; मात्र सध्या डायटने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यासाठी केवळ एकच प्रशिक्षण केंद्र व तेही रत्नागिरी येथे ठेवून एकांगी कारभार सुरू केला आहे. याबद्दल शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकाच प्रशिक्षण केंद्रामुळे शिक्षकांना डोंगरातून व खेडेगावातून प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागते.

या शिक्षकांना रत्नागिरीमध्ये निवासाची कोणतीही सुविधा नाही. प्रशिक्षणादरम्यान कोणतेही प्रकारचा भत्ता नाही त्याशिवाय शिक्षकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. प्रशिक्षणात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याबाबत कुठलाही गांभीयनि व सद्भावनेने विचार केला जात नाही. शिक्षकांना वेठीस धरणे एवढाच प्रशासनाचा हेतू दिसून येतो, असा प्रश्ना जिल्हाध्यक्ष संजय पाथरे यांनी उपस्थित केला आहे. नुकतेच निवळी येथे शिक्षकांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरीही अनेक शिक्षक आजही गंभीर अवस्थेत आहेत

तर मोर्चा काढणार
सध्या सुरू असलेले प्रशिक्षण तत्काळ बदलून ते विभागवार दोन व तीन तालुक्यांसाठी एक याप्रमाणे घ्यावे. त्यानंतरच्या प्रशिक्षणात सदरची मागणी मंजूर झाली नाही तर शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हास्तरावर मोर्चा काढून निषेध करण्यात यात येईल, असे शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 12/Jun/2025