रत्नागिरी : कामगार न्यायालय रत्नागिरीचे आठवे न्यायाधीश म्हणून एस. व्ही. जोशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. लेबर लॉ प्रॅक्टिस असोसिएशनच्या वतीने एलएलपीएचे अध्यक्ष अॅड. एस. एम. देसाई यांनी बारच्या वतीने स्वागत केले.
या वेळी कामगार न्यायाधीश जोशी यांनी बेंच आणि बार यांचे संबंध चांगले राहावेत यासाठी वकील संघटनेचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. एलएलपीएचे सचिव अॅड. विद्यानंद जोग यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी अॅड. कांबळे, अॅड. मकरंद कदम, अॅड. अजित वायकुळ, अॅड. अमित वायकुळ, अॅड. अथर्व देसाई आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 12/Jun/2025














