रत्नागिरी : विविध शासकीयच नव्हे तर अशासकीय कामांसाठीही जन्म दाखल्याची आवश्यकता भासते. शिवाय मृत्यू दाखलाही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२५ या दीड वर्षात रत्नागिरी नगर परिषदेकडून २,३०१ मृत्यू दाखले, तर ८,६४७ जन्म दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यातून रत्नागिरी नगर परिषदेला एकूण एक लाख ५३ हजार ५० रुपयांचा महसूल मिळाला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे जन्म दाखला, मृत्यू दाखल्यासाठी शुल्क आकारणी केली जाते. जन्म दाखल्याची पहिली एक प्रत मोफत दिली जाते. परंतु, उर्वरित मागणीनुसार प्रति प्रतीसाठी ५० रुपये शुल्क आकारणी केली जाते. शाळा प्रवेश तसेच अन्य कामांसाठी जन्म दाखला गरजेचा असल्याने पालक एकापेक्षा जास्त प्रतींची मागणी करतात. त्यामुळे नगर परिषदेच्या तिजोरीत भर पडते. तसेच मृत्यू दाखल्यासाठी शुल्क आकारणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 12/Jun/2025














