रत्नागिरी : सैतवडे-बोरसई अंगणवाडी सेविका पदासाठी १९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ मार्फत ग्रामपंचायत सैतवडेमधील सैतवडे बोरसई या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका रिक्त पद भरावयाचे असून, इच्छुक स्त्री स्थानिक उमेदवारांनी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी ५, शंकेश्वर पार्क, बी विंग, रुम नं. ५, ता. जि. रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ यांनी केले आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यक (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) असून पदवीधर, पदव्युत्तर, डी. एड, बी. एड असल्यास गुणपत्रक आवश्यक आहे. ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडेमधील रहिवासी असणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 12/Jun/2025