लांजा तहसीलमार्फत महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर

लांजा : २०२४-२५ या महसुली वर्षांमध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाकडून ‘महाराजस्व अभियान’ राबविण्याबाबतचे निर्देश तहसील कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यानुसार लांजा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या महसुली गावांमध्ये १२ जून ते २९ जुलै या कालावधीत महाराजस्व अभियानाला सुरुवात झाली असून महसुली सेवांचे शिबिर राबविण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या महसूल विषयक सेवा दाखले पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्यक योजना यामध्ये संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, शिधापत्रिका वाटप, जिवंत सातबारा, फेरफार, आठअ वितरण, अॅग्रीस्टॅक नोंदणी, एकूण नोंदी, वारस नोंदी, निसप्र विषयक नोंदी, अतिक्रमित बंद रस्ते सुरू करणे, अनुक्रमांक देणे व सातबारा वर नोंदणी करणे यासंह महसूल विषयक विविध सेवा दाखल्यांचे प्रस्ताव तयार करून लाभार्थ्यांना पारदर्शक पद्धतीने वितरणया शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.

लांजा तहसील क्षेत्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी महसूल मंडळातील नागरिकांनी आवश्यक त्या कागदपात्रांसह शिबिराला उपस्थित राहून महसूलविषयक विविध सेवा दाखले, प्रमाणपत्र यांचा लाभ घ्यावा व महसूल प्रशासनांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 12/Jun/2025