Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; दुपारपासून आचारसंहिता

Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024

Vidhan Sabha Election 2024 : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा विषय म्हणजे विधानसभा निवडणूक. या विधानसभा निवडणुकीचा बिगूल आज वाजणार आहे. आज दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने माध्यमकर्मींना पत्रकार परिषदेचं निमंत्रण धाडलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा मंगळवारी जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून दुपारी साडेतीन वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये आयोगाच्या सदस्यांनी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना मागवल्या होत्या. त्याचवेळी निवडणुका जाहीर होतील, असं वाटत असताना आयोगाने केवळ तांत्रिक माहिती देत सणांच्या तारखा टाळून निवडणुका होतील, असं म्हटलं होतं. त्यानुसार मंगळवारी पुन्हा आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखा वगळून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होईल. महायुतीमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना; अशी थेट लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी अद्यापही जागावाटप जाहीर केलेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांचं त्रांगडं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी सोमवारी दिल्लीमध्ये बैठकही पार पडली मात्र अजूनही त्याबाबत निर्णय झाला नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये फारकही बरं चाललंय अशी गोष्ट नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपात कसा तोडगा निघणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vidhan Sabha Election 2024 आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

What Is Code of Conduct In ElectioVidhan Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषदे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच म्हणजेच निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. यापूर्वीही तुम्ही आचारसंहिता हा शब्द अनेकदा ऐकला असेल. मात्र आचारसंहिता आजपासून लागणार म्हणजे काय? त्याच सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार? हेच जाणून घेऊयात..

भारतामधील सर्व निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात. देशात निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे व्हाव्यात याची सर्व जबाबदारी आयोगावर असते. यासाठीच त्यांनी राजकीय पक्ष, उमेदवारांना काही नियम घालून दिले आहेत. याच नियमांना सर्वसाधारणपणे आचारसंहिता असं म्हणलं जातं. निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनी हे नियम म्हणजेच आचारसंहिता पाळणं बंधनकारक असतं.

निवडणूक आयोगाने माध्यमकर्मींना पत्रकार परिषदेचं निमंत्रण धाडलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा मंगळवारी जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून दुपारी साडेतीन वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये आयोगाच्या सदस्यांनी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना मागवल्या होत्या. त्याचवेळी निवडणुका जाहीर होतील, असं वाटत असताना आयोगाने केवळ तांत्रिक माहिती देत सणांच्या तारखा टाळून निवडणुका होतील, असं म्हटलं होतं. त्यानुसार मंगळवारी पुन्हा आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखा वगळून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाला कारवाईचा अधिकार Vidhan Sabha Election 2024

कोणत्याही उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने या नियमांचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा अधिकार असतो. अनेकदा अशाप्रकारच्या कारवाया यापूर्वी झालेल्या आहेत. एखाद्या गंभीर नियमाचं उल्लंघन करत आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवारावर निवडणूक लढवण्यास बंदीही घातली जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करुन अगदी तुरुंगावासाच्या शिक्षेचीही तरतूद यामध्ये आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर असलेल्या आचारसंहितेविषयीच्या माहितीमध्ये प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयीचे नियम आणि अटी दिलेल्या आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाने काय करावं आणि काय करु नये, त्यांचा एकंदरित व्यवहार कसा असावा याचबरोबर मतदान केंद्रावर उमेदवारांना काय करण्याची मूभा आहे आणि ते काय करु शकत नाही याचा उल्लेख आचारसंहितेमध्ये असतो. निवडणुकांदरम्यान सत्ताधारी पक्षाने कसं वागावं, त्यांची भूमिका कशी असावी याचाही उल्लेख आचारसंहितेमध्ये असतो. Vidhan Sabha Election 2024

पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून लाठीमार केला : राजेश सावंत