मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील मांडवी येथील झाडीझुडपात विदेशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तकीम ईबणे अली पेजे (वय ४२, रा. प्रथम अपार्टमेंट आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी दोन मांडवी येथील एका झाडीझुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मांडवी येथील झाडीझुडपाच्या आडोशाला मद्यपान करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 21-06-2025