पूर ओसरल्याने खेडमध्ये सफाई सुरू

खेड : जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरात शिरल्यामुळे गुरुवारी (ता. १९) रात्रभर खेड शहरात पूरस्थिती निर्माण झालेली होती; मात्र पाऊस कमी झाल्यानंतर शुक्रवारी पुराचे पाणी पूर्णतः ओसरले. पुराच्या पाण्याबरोबर शहरातील रस्त्यावर साचलेला चिखल स्वच्छ करण्याचे काम नगरपालिकेमार्फत दिवसभर सुरू होते. पूर ओसरल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे.

नगरपालिकेकडून सकाळपासूनच युद्धपातळीवर स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्त्यांवरील चिखल हटवणे, सांडपाण्याचा निचरा यांसह विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर उघडले असून, ग्राहकांची वर्दळही दिसू लागली आहे. प्रशासन नुकसानीचा आढावा घेत असून, गरजूंना मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खेडवासीयांसाठी ही परिस्थिती दिलासा देणारी असून, लवकरच शहर पूर्णतः पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मागील चोवीस तासांत मंडणगडमध्ये सर्वाधिक १४४.७५ मि.मी. पाऊस पडला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 21/Jun/2025