चिपळूण : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध करण्याचे प्रयत्न नियमितपणे सुरू आहेत. आगामी कालावधीत रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे तरुणांसाठी विशेष नोकरी केंद्र स्थापन करून रोजगाराच्या संधी वाढवल्या जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
ते चिपळूण येथील विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शिवसेना चिपळूण शहरातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन येथील अतिथी सभागृहात केले होते. वेळी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत ५३८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, रश्मी गोखले, प्राजक्ता टकले, शहरप्रमुख उमेश सकपाळ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 21/Jun/2025













