मंडणगड : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव, मध्ये आज 21 जून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम राष्ट्रगीत व राज्य घेण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री. किशोर कासारे यांनी प्रास्ताविक केले. जागतिक आरोग्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित मान्यवर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांचे सौ मानसी पालांडे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील उपक्रमशील क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण यांचेही मुख्याध्यापकांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमानिमित्ताने क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण यांनी योग व योगाच्या आवश्यकता, योगाचे फायदे व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक म्हणाले की, आरोग्य हे उत्तम धन आहे. आरोग्य जीवनाचा आधारस्तंभ आहे. जे आरोग्य संपन्न असतात तेच खरे सुखी असतात. धनाच्या राशी असूनही जर आरोग्य चांगले नसेल तर धन निरुपयोगी वाळवंटातील मृगजळ ठरते. आरोग्य हीच खरी शक्ती आणि सुखाची शिदोरी आहे. त्याचबरोबर ती यशाची गुरुकिल्ली देखील आहे. असे सांगून भारतीय संस्कृतीने जगाला योग दिला आहे. आपण भारतीय त्यापासून वंचित आहोत; म्हणून आरोग्य आणि मनाच्या शांतीसाठी प्रत्येकाने दररोज पंधरा मिनिटे का होईना, ध्यान व योग साधना केली पाहिजे. असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यानंतर कुमारी स्मरणिका गायकवाड, ईश्वरी खामकर, नमिता देऊरकर यांनी श्लोक घेतला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ओंकार चा सराव केला. यानंतर योगाच्या सरावाला सुरुवात झाली. श्री. मनोज चव्हाण यांनी योगाचे विविध प्रकार करून घेतले. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक, शिक्षिका यांनीही योगाचा सराव केला. अशाप्रकारे’ योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी योग सराव केल्यानंतर आनंद व्यक्त केला. यापुढे हा सराव आम्ही नियमित चालू ठेवू असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माननीय मुख्याध्यापक श्री. विजय खाडे, शिक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री. विक्रम शेले, श्री. जितेंद्र कलमकर, श्री. किशोर कासारे, सौ. मानसी पालांडे, सौ. विनया नाटेकर, सौ. अनिता बिराजदार, श्रीम. वैशाली पुदाले तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. कृष्णा दळवी, श्री. भाई गुडेकर, श्री. संजय गौड व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 21/Jun/2025













