दापोली : हर्णे रस्त्यावर बैलांच्या झुंजीने वाहतूक ठप्प

दापोली : शहरातील हर्णे रस्त्यावर शुक्रवारी सकाळी दोन बैलांमध्ये जोरदार झुंज झाल्यामुळे एका तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. नागरिक तसेच पोलिसांनी बराच काळ प्रयत्न केल्यानंतर ही झुंज आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत वाहतूक बंद राहिली आणि काही वाहनांचे नुकसानही झाले.

सकाळी गर्दीच्यावेळी या झुंजीचा थरार लोकांना पाहायला मिळाला. रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. बैलांची झुंज इतकी तीव्र होती की, नागरिकांनी केलेल्या प्रयत्नानंतरही ती थांबवता आली नाही. बैल परस्परांवर हल्ला करत राहिल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनेमुळे हर्णै रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. बैलांच्या धक्क्याने काही वाहनांचेही नुकसान झाले. अखेर तासापेक्षा जास्त काळानंतर ही झुंज संपली आणि त्यानंतरच वाहतूक मार्गस्थ झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 21/Jun/2025