राजापुरात विजेचा खेळखंडोबा

राजापूर : दिवसभरात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील व्यापारी व वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. यंदाच्या मोसमी पावसाच्या सुरुवातीलाच महावितरणच्या कारभाराचा फटका शहर आणि तालुक्याला बसला आहे. ग्रामीण भागातही विनाखंड वीजपुरवठा केला जावा, अशी मागणी ग्राहकांची आहे.

गेले काही दिवस राजापूर शहरात दर दिवशी असंख्य वेळा वीज गायब होण्याचे प्रकार दिसून येत आहेत. याचा फटका ग्राहकांप्रमाणेच दूध, आईस्क्रीम विक्रेते, मेडिकल स्टोअर्स यांना बसला आहे.

सतत खंडित विजेमुळे होणाऱ्या शासकीय कार्यालये, बँका यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन वीजव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 21/Jun/2025