रत्नागिरी-पावस मार्गावर व्हॅगन आर गाडीचा भीषण अपघात; गाडीने घेतल्या चार पलट्या!

रत्नागिरी, २१ जून २०२५: पावस-रत्नागिरी मार्गावर आज एका व्हॅगन आर कारचा भीषण अपघात झाला. पावसहून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना या गाडीने चार पलट्या घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

प्रवाशांची सद्यस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 21/Jun/2025