रत्नागिरी पोलीस दलामार्फत योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलामार्फत उद्यमनगर येथील नाईक हॉल येथे कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (२१ जून) जागतिक योग दिनानिमित्त योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके कार्यक्रम घेण्यात आला.

या “योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक, नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सर्व उपस्थितांना योगशिक्षक कीर्तीकुमार औरंगाबादकर, पतंजली निरामय योग संस्थेचे वीरु स्वामी, या संस्थेमधील ३५ सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायाम बाबत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

या आंतरराष्ट्रीय योग दिनी कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी सर्व उपस्थित पोलिस अधिकारी व अंमलदार यांना योगाला केवळ एक सराव म्हणून नव्हे तर जीवनाचा एक मार्ग म्हणून स्वीकारण्यासाठी दररोज फक्त २०-३० मिनिटे योगासाठी समर्पित करण्यास सांगितले. तसेच एक निरोगी व तणाव मुक्त आयुष्य जगण्याबाबत मार्गदर्शन केले.

या “योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक व रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार असे ३०० जणांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी परि. पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी २० जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यास भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची “गुन्हे आढावा बैठक” घेऊन त्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 21/Jun/2025