ना. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भाजपची वृद्धाश्रमाला मायेची ऊब!

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य विकास मंत्री तथा भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुका भाजपने सामाजिक बांधिलकी जपली आहे. रत्नागिरी तालुका दक्षिण, उत्तर आणि मध्य या तिन्ही मंडळांनी एकत्र येत पावस येथील अनुसया महिला वृद्धाश्रमातील भगिनींना बेडशीट, फळे आणि लाडू वाटप करत मायेची ऊब दिली.

यावेळी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक देसाई मॅडम आणि फडके मॅडम यांनी वृद्धाश्रमाच्या कार्याची माहिती दिली. भाजपच्या या उपक्रमाचे वृद्धाश्रम व्यवस्थापनाने कौतुक केले.

या कार्यक्रमाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे, तालुकाध्यक्ष (दक्षिण) दादा दळी, तालुकाध्यक्ष (उत्तर) विवेक सुर्वे, मध्य तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, सरचिटणीस सुशांत पाटकर, उमेश देसाई, उपाध्यक्ष राजेश पाथरे, महिला आघाडीच्या दीक्षा गझने, प्रज्ञा शिवगण, अपूर्वा जोशी यांच्यासह अजय पानगले, संतोष सुर्वे, प्रकाश पवार, प्रवीण पाथरे, आशिष भाटकर, जगन्नाथ पवार, संतोष रेघे, गुरुदास गोविलकर, संदीप पवार, ऋग्वेद दळी, प्रज्योत गुळेकर, संदीप प्रसाद पवार, कृष्णा नैकर, माधव पोतकर, विजय निकम, अविनाश वरवडकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 23-06-2025