शिक्षणात भ्रष्टाचार नसलेला भाग म्हणजे कोकण : विनायक राऊत

लांजा : शिक्षणात भ्रष्टाचार नसलेला एकमेव भाग म्हणजेच कोकण आणि कॉपीमुक्त परीक्षा म्हणजे कोकण अशी ओळख गेली अनेक वर्षे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार विनायक राऊत यांनी लांजा येथे केले.

लांजा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आयोजित १० वी, १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि नासा इस्त्रो, नवोदयसाठी निवडले गेलेले विद्यार्थी यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम अजिंक्य मंगल कार्यालयात झाला.

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, माजी आमदार गणपत कदम, रवींद्र डोळस, उल्का विश्वासराव, भाई विचारे, चंद्रकांत शिंदे, परवेश घारे, सुरेश करंबेळे, पूर्वा मुळे, युवराज हांदे, संतोष हातणकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी राऊत म्हणाले, दहावी व बारावी परीक्षेत कोकण हा मागे राहिलेला नाही. दर्जेदार बुद्धिमत्तेचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा व अन्य खासगी शाळांतून निर्माण करण्याचे काम जे शिक्षक करतात व त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पालक करतात. त्यांचे खऱ्या अर्थाने अभिमान आणि कौतुक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 23/Jun/2025