रत्नागिरी : कणकवली ते रत्नागिरी रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या कोकण कन्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एका २४ वर्षीय तरुणाचा २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. १७ जून रोजी रात्री ८.५० ते १०.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, २० जून रोजी याप्रकरणी रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथील रहिवासी बजरंग भगवानाराम लेगा (वय २४) हे कोकण कन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २०११२ अप) च्या इंजिनजवळील जनरल बोगीतून प्रवास करत होते. सीटवर झोपलेले असताना त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला सॅमसंग कंपनीचा जांभळ्या रंगाचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने लंपास केला. फिर्यादीच्या झोपेचा फायदा घेऊन, त्यांच्या नकळत हा मोबाईल चोरण्यात आला.
याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा (गु.र.नं. २५५/२०२५) दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी लोहमार्ग पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 23-06-2025













