आंबा घाटात दरड कोसळली

संगमेश्वर : संगमेश्वर-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील दख्खननजीक दरड कोसळली. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली दख्खन गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेची पाईपलाइन पूर्ण गाडली गेली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या वरच्या बाजूने कापलेल्या डोंगराला भेगा गेल्या असून, ती माती खाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथून वाहणाऱ्या ओहोळाचे पाणी सिमेंट नाले गाळाने भरल्याने रस्त्यावरून वाहते. कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी वाहतूक अखंडित राहावी यासाठी यंत्रसामग्रीसह सज्ज असले तरी त्यांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. या मार्गावरून वाहतूक एकेरी सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 23/Jun/2025