सावर्डे : महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून वीजबिले न भरण्याचा निर्णय संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. तसे पत्र ग्रामपंचायतीने महावितरणला दिले आहे, अशी माहिती उपसरपंच जाकीर शेकासन यांनी दिली.
महावितरणला दिलेल्या पत्रानुसार दोन महिन्यांपूर्वी वीजग्राहकांची परवानगी न घेता आणि कोणतीच कल्पना न देता स्मार्ट वीजमीटर बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे दोन महिन्याची वीज युनिट एकदाच आकारणी करून वीजबिले पाठवण्यास सुरुवात केली आहे.
१०० युनिटपर्यंत वेगळा युनिट दर असून, १०० च्या पुढे जादा युनिट दर आकारण्यात येत आहे. एक महिन्याची युनिट आकारणी न करता दोन महिन्यांची आकारणी एकाचवेळी करण्यात आल्याने युनिट संख्या १०० हून अधिक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 23/Jun/2025













