गरीला अडकलेल्या समुद्री कासवाला तरुणाकडून जीवदान

पावस : रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथे मासे गरवण्यासाठी गेलेल्या श्री साईल दिनेश पानगले या युवकाने १५ किलो वजनाच्या समुद्री कासवाला जीवदान दिले. सध्या मासेमारीला समुद्रावर बंदी असल्याने स्थानिक पातळीवर अनेक लोक किनारी भागामध्ये मच्छीमारी करीत असतात. त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे गावातील साहील दिनेश पानगले हे मासे गरवण्यासाठी समुद्रकिनारी गेले असताना रात्रीच्या वेळी गरी टाकलेली असताना त्याला कासव लागल्याचे लक्षात आले. गरीला लागलेली ही वस्तू जड असल्याचे लक्षात येतात त्याने मित्रांच्या सहाय्याने गरीत अडकलेल्या कासवाला इजा होणार नाही, अशा पद्धतीने सोडवून खोल पाण्यात सोडून जीवदान दिले.

या संदर्भात साहील पानगले म्हणाले की, मासेमारीची गरी हा लोखंडी धातू असतो. अडकलेली गरी तशीच कासवाच्या शरीरात राहिली असती तर कासवाला पाॅयझन होण्याचा धोका निर्माण झाला असता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 23/Jun/2025