चिपळूण : रेहेळ भागाडी येथे गोठा कोसळला

चिपळूण : चिपळूण शहर परिसरात अधूनमधून वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे शहरानजिकच्या रेहेळ भागाडी येथील संदेश बाबू टाणकर यांचा गोठा कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. २१) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळात घडली आहे.

दरम्यान, गोठा कोसळण्याच्या व्यतिरिक्त जीवित हानी झाली नाही. गेले दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसत असून अधूनमधून पाऊस विश्रांती घेत आहे. दि. १ ते २२ जूनअखेर सरासरी ६२१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळपर्यंत चोवीस तासात चिपळूण शहरात १६ मि.मी., खेर्डी येथे ११ मि.मी., सावर्डेत १६ मि.मी., वहाळ ३० मि.मी., असुर्डे १२ मि.मी., रामपूरमध्ये ६ मि.मी., कळकवणेत १० मि.मी., शिरगाव २७मि.मी., मार्गताम्हानेत ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शेतीला उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 23/Jun/2025