गुहागर : तालुक्यातील अंजनवेल, रानवी शृंगारतळी आबलोली रत्नागिरी या राज्य मार्गावरील कोतळूक येथे मोरी खचली होती. यावरून ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी लक्ष वेधले होते. यानंतर त्यानुसार तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी बांधकाम विभागाला मोरीची दुरूस्ती तातडीने करण्याच्या सूचना केल्या. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग गुहागरचे शाखा अभियंता योगेश थोरात यांनी पाहणी करून तात्पुरती मलमपट्टी करून तात्पुरता दिलासा दिला आहे.
पावसामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करता येत नसली, तरी याठिकाणी पुन्हा मोरी खचण्याची भीती व्यक्त होत आहे. तहसीलदार परिक्षीत पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल कोतळूक सरपंच प्रगती मोहिते, सदस्य सचिन ओक, नियमित वाहन चालक, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 23/Jun/2025













