खेड : खेड तालुक्यातील लोटे येथील कोजन प्लांटमध्ये २१ जून रोजी दुपारी १२.३० वाजता एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. पिंटू बबन सिंह (वय ४३, रा. लोटे, मूळ रा. सुंदरपूरकुडीया, बिहार) असे मृताचे नाव असून, ट्रकवरील लोखंडी सामानावरून पाय घसरल्याने हा अपघात घडला.
याप्रकरणी २१ जून रोजी रात्री ८.१६ वाजता खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (आमू. क्रमांक ६४/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बबन सिंह हे लोटे येथील कोजन प्लांटमध्ये अश्विनी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज कंपनीचा ट्रक (एमएच१२/एलटी/९०९६) लोखंडी माल घेऊन थांबलेला असताना, त्या ट्रकमध्ये काय माल आहे हे पाहण्यासाठी चढले. यावेळी त्यांचा ट्रकमधील लोखंडी सामानावरून पाय घसरला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तात्काळ प्रथम लवेल येथील आणि त्यानंतर कळंबणी येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 23-06-2025













