लांजा : रात्रीच्या वेळी भर वस्तीत असलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याने गुरांवर केलेल्या हल्लात एका पाडीचा मृत्यू झाला आहे. ही घटना लांजा बौद्धवाडी येथे शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातलेला असताना आता या बिबट्याने लांजा शहराकडे आपला मोर्चा वळवला आहे. लांजा बौद्धवाडी येथे भर वस्तीत या बिबट्याने आपला मुक्त संचार सुरू केला आहे.
शनिवारी रात्री लांजा बौद्धवाडी येथे भर वस्तीत शिरुन बिबट्याने संदीप कांबळे यांच्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला केला. संदीप कांबळे यांचा घरापासून काहीच अंतरावर गोठा आहे. मात्र भर वस्तीत असलेल्या गोठ्यात शिरून बिबट्याने केलेला हल्ल्त्यात संदीप कांबळे यांची एक पाडीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये संदीप कांबळे यांचे पाच ते दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान भर वस्तीत शिरून बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे लांजा बौद्धवाडीसह शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी वनखात्याने पिंजरा लावावा अशी मागणी देखील केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 23/Jun/2025













