संगमेश्वर तालुक्यात खताचा तुटवडा

संगमेश्वर : खरीप हंगामाच्या तोंडावर संगमेश्वर तालुक्यात खत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. विक्री केंद्रांवर पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सकाळपासूनच खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत असून अनेक तास वाट पाहूनही आवश्यकतेप्रमाणे खत मिळत नाही. काही शेतकल्यांना ९० किलो खताची गरज असताना फक्त २० किलो खत मिळत आहे.

ही स्थिती प्रगतशील शेतकऱ्यांनाही संकटात टाकणारी ठरत आहे. भात लावणीस सुरवात होण्याची वेळ जवळ आली असतानाही शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने, ‘शेती करायची तरी कशी?’ असा प्रश्न पडला आहे. खत नियमित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी आणि कृषी संघटनांकडून करण्यात येत आहे. खत विक्रीचे योग्य नियोजन न झाल्यास खरीप हंगामावर संकट कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 23/Jun/2025