रत्नागिरी : प्रत्येक नागरिकाच्या समाधानासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, गतिमान आणि लोकोपयोगी कामांवर भर देत आहे. हे शासन जनतेच्या हिताचे असून, त्यांना अपेक्षित सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असल्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
दापोली तालुक्यातील पालगड येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ना. कदम पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासन जनतेच्या समस्या सोडवून त्यांना समाधान देण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांना अडचणीशिवाय सेवा पुरवण्याचा सरकारचा मानस आहे. यापुढेही अशी शिबिरे राज्यभर आयोजित करून जनतेला लाभपोहोचवण्याचा निर्धार आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्यासह मंडळ अधिकारी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गत्तिमान व पारदर्शक करण्यासाठी दापोली तालुक्यातील कॅम्प दापोली, दाभोळ, हर्णे, आंजर्ले, बुरोंडी, आगरवायंगणी, देगाव, वेळवी, वाकवली, पालगड येथे ही शिबिरे घेण्यात आली. गावागावांतील जनतेस दैनंदिन कामकाजासाठी लागणारे विविध दाखले, महसूलविषयक सेवा या शिबिरातून देण्यात आल्या. शिबिरांमध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे
दाखले, नॉन-क्रिमिनल दाखले, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीय प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसाहाय्य योजनेसाठी कागदपत्रे, शिधापत्रिका बाटप, जिवंत सातबारा, अॅग्रीस्टॅक नोंदणी, एकूप नोंदी/बारस नोंदी, निसप्र विषयक नोंदणी (वर्ग २ च्या नोंदी वर्ग १ करणे) अतिक्रमित बंद रस्ते सुरू करणे, अनुक्रमांक देणे व सात-बारावर नोंदणी करणे, अशा विविधप्रकारचे दाखले अनेक नागरिकांना वितरित करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 23/Jun/2025













