रत्नागिरी : समाज कल्याण विभागामार्फत गुरुवारी ‘सामाजिक न्याय दिन’

रत्नागिरी : सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग व समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे २६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे हे आहेत. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य रविंद्र कदम यांची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि एआय कार्यशाळा, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक, विनायक कदम हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 23/Jun/2025