रत्नागिरी : पोदार प्रेपने नुकताच मातांसाठी एक अतिशय ऊर्जावान आणि पद्धतशीर असा तीन दिवसीय झुंबा वर्कशॉप आयोजित केला होता. या वर्कशॉपचा उद्देश केवळ शारीरिक स्वास्थ्य सुधारणे हा नसून, मातांना एकत्र येऊन मजा करण्याची, आराम करण्याची आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची संधी मिळावी हा होता.
या विशेष कार्यक्रमात माता-पालकांसह त्यांच्या मैत्रिणी आणि कुटुंबीयांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये शाळेच्याच सुप्रसिद्ध झुंबा ट्रेनर आणि स्पोर्ट्स शिक्षिका सौ. सपना साप्ते यांनी सहभागी माता-पालकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागींनी झुंबाच्या तालावर मनसोक्त थिरकत आरोग्य आणि आनंदाचा अनुभव घेतला.
या वर्कशॉपने मातांना केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर एकमेकींशी जोडून घेऊन, ताणतणाव कमी करून आणि स्वतःसाठी काही आनंददायी क्षण देऊन एक अविस्मरणीय अनुभव दिला. हा झुंबा इव्हेंट सर्वांसाठीच खूप उत्साहपूर्ण आणि आनंददायी ठरला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:35 23-06-2025













