साडवली : झाडे लावण्यासाठी खोदलेले खड्डे गायब झाल्याची घटना करंबेळेतर्फे देवळे झोरेवाडी येथे घडली आहे. तुकाराम भागोजी काबदुले (वय ७७) यांनी वडिलोपार्जित जागेत मजूर लावून खोदलेले ४३ खड्डे गायब झाल्याची लेखी तक्रार देवरूख पोलिस ठाणे व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. तुकाराम काबदुले हे मुंबई येथे वास्तव्यास असतात. देवळे येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन व घर आहे.
काबदुले यांनी घराजवळील रिकाम्या जागेत १४ जूनला मजूर बोलावून झाडे लावण्यासाठी ४३ खड्डे खोदले होते. १८ जूनला ते मुंबईहून परत आले असता त्यांना खोदलेले खड्डे बुजवण्यात आल्याचे दिसले. हे सर्व खड्डे अज्ञाताने माती टाकून बुजवले असल्याची तक्रार काबदुले यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीचा शोध घेऊन आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी काबदुले यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 24/Jun/2025














