गावतळे : दापोली तालुक्यातील गावतळे परिसरातील ३२ गावांमध्ये तब्बल महिनाभर विजेचा लपंडाव सुरू असून, सरासरी दिवसाला ३ ते ५ तास वीजप्रवाह खंडित असतो. वारंवार होणाऱ्या या प्रकाराला सर्वजण संतप्त असून, उग्र आंदोलनाच्या
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा अनपेक्षित पाऊस सुरू झाला तेव्हापासून जवळजवळ दर दिवशी वीजप्रवाह खंडित होत आहे. विशेष म्हणजे दिवसातून १५ ते २० वेळा वीजप्रवाह खंडित होतो. वीजप्रवाह खंडित पूर्ववत होण्याची वेळ ५ मिनिटापासून ५ तासापर्यंत असते. यामुळे गावतळे, फणसू बाजारपेठ आणि इतर गावातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुग्धजन्य पदार्थाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पावसाळा असल्याने मच्छरचे प्रमाण वाढले असताना दरदिवशी रात्री वीजप्रवाह खंडित होत आहे. वारा, पाऊस, विजेचा कडकडाट नसताना बहुतेकवेळा हा वीजप्रवाह खंडित होत आहे. या विषयी उपअभियंता वाकवलीचे सागवेकर यांना याबाबत वारंवार विचारणा केली असता त्यांचे नेहमी ३३ केव्ही नादुरुस्त असून कर्मचारी काम करत आहेत.
गावतळे परिसराला देगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. येथे कार्यरत सहाय्यक अभियंता शेवरे यांना फोन केला असता ते सागवेकर यांच्याकडे बोला, असे सांगतात. या दोन अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या प्रकारात विजेचा खेळखंडोबा बंद होत नाही. ३२ गाव परिसरातील ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नीलेश शेठ यांनी सांगितले, अनेकवेळा महावितरणच्या अधिका-यांशी बोललो आहे. त्यांनी जी मुदत मागितली होती ती संपली असूनही पुढील १० दिवसात जर वीजप्रवाह अखंडितपणे चालू झाला नाही तर मी स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करेन. त्यानंतर मात्र होणाऱ्या परिणामांना महावितरणने तयार राहावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 24/Jun/2025














