ब्रेकिंग : Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार; 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.

असं असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक –

  • निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
  • मतदान : 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

288 जागांसाठी किती मतदार असतील? Maharashtra Vidhan Sabha Elections 2024

  • एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
  • नव मतदार – 20.93 लाख
  • पुरूष मतदार – 4.97 कोटी
  • महिला मतदार – 4.66 कोटी
  • युवा मतदार – 1.85 कोटी
  • तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
  • 85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार – 6.32 लाख

महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?

  • एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
  • शहरी मतदार केंद्र – 42,604
  • ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
  • महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
  • एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल. Maharashtra Vidhan Sabha Elections 2024

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024

महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील.

मतदारांसाठी सुविधा पोर्टल अॅप

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल. Maharashtra Vidhan Sabha Elections 2024

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 15-10-2024