Maharashtra Election : ज्येष्ठ नागरिकांना घरुन करता येणार मतदान

मुंबई : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने सांगितले की, सर्व पोलिंग स्टेशनवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. आम्ही रिव्ह्यू केला आहे.

बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना डीओबी जाहीर करण्यात आलं आहे. ते सर्व रिसोर्स वापरतील. लाइनच्यामध्ये खुर्ची आणि बेंच ठेवणार आहे. रांगेत उभं राहणाऱ्यांना बसायला मिळेल. थकवा दूर होईल.

ज्येष्ठ नागरिकांना घरुन करता येणार मतदान

ज्येष्ठ नागरिकांना मतदान करणं सोपं जावं यासाठी ८५ वर्षाच्या वरच्या व्यक्तीला घरून मतदान करता येणार आहे. फॉर्म भरून देणाऱ्याकडे आमची टीम तिकडे जाणार आहे. तिकडे जाताना सर्व उमेदवारांना रूट चार्ट देणार आहे. त्यांनाही सोबत घेतलं जाईल. सर्व गोष्टींची व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे. प्रत्येक निवडणुकीत व्हिडीओग्राफी केली जाते.

राज्यात किती मतदार

महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र असतील.

  • ४.९७ कोटी पुरुष मतदार
  • ४.६६ कोटी महिला मतदार
  • १.८५ कोटी तरुण मतदान
  • २९.९३ लाख नवीन मतदार
  • ९.६५ कोटी एकूण मतदार

जास्तीत जास्त मतदान करावं. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात म्हणून सख्त निर्देश दिले आहेत. आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारचं प्रलोभन, पैसे वाटप, ड्रग्स वाटप, दारूचं वाटप यावर लक्ष असेल. विमानतळासह सर्व गोष्टीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चेकपोस्टवर ही लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी या ठिकाणी मल्टिपल टीम तैनात राहील. २४ तास चेकिंग करणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील. चेकिंगचा अर्थ असा नाही की सर्व सामान्यांना त्रास द्यावा, असंही सांगितलं आहे.

राज्यात निवडणुका कधी?

  • २२ ऑक्टोबला निवडणुकीची अधिसुचना जाहीर होणार आहे.
  • २९ ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे.
  • ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
  • २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
  • २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:17 15-10-2024