Maharashtra assembly monsoon session 2025 : मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज विधानसभेत खडाजंगी झाली. लोणीकर आणि कृषीमंत्री राज्यातील शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली. यावेळी पटोले यांनी असंसदीय भाषेचा वापर केल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले.
विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?
नाना पटोले अध्यक्ष असताना राजदंडाला स्पर्श केल्यानंतर यासंदर्भातील नियम झाला होता. त्यामुळे सभागृहाचे पुढील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत असल्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
पटोले यांनी माफी मागावी : मुख्यमंत्री
एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे. पण अध्यक्षांवर धावून जाणे, जणू अध्यक्षच दोषी आहेत, अशा पद्धतीने धावून जाणे योग्य नाही. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तींनी असं अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही. त्यामुळे पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 01-07-2025














